गंध, निरोप आणि रेस्टॉरेंट सारख्या नावाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिगदर्शक सचिन कुंडलकर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यांचा नविन सिनेमा ''हैप्पी जर्नी'' घेऊन. अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष अभिनीत हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अतुल कुलकर्णी यांनी मधंतरि हिंदी व दक्षिणेतल्या विविध भाषांमधून काम केल्यानंतर मराठी मध्ये अलीकडे नटरंग, प्रेमाची गोष्ट, पोपटच्या निमित्ताने त्यांनी आपली दर्जेदार उपस्थिति दाखवून दिली आहे.
यूटुबवर सध्या गाजत असलेल्या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये, ''हैप्पी जर्नी'' सर्वात पुढे असलेल्या चित्रपटापैकी एक आहे. आता पर्यन्त एक लाखापेक्षा अधिक हिट्स या ट्रेलरला मिळालेले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षणीय असून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा आहे. ट्रेलर मध्ये सर्व कलाकार वेगळया लुक मध्ये दिसतात. भाऊ व बहिणीच्या कथेची पार्श्वभूमि असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये त्यांच्या यात्रेचा वापर करण्यात आला आहे.
सध्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इंग्रजीचा वापर वाढत आहे, सोबतच इंग्रजी नाव असलेल्या मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, त्यामध्ये मॅटर, टाइम प्लीज, टाइम पास, येलो, पोश्टर बॉयज व आता ''हैप्पी जर्नी '' यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल. असो ''कालाय तसमै नमः''.

No comments:
Post a Comment