आज तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, बावरे प्रेम हे, टपाल आणि राखणदार. सिद्धार्थ चांदेकर व उर्मिला कानेटकर अभिनीत ''बावरे प्रेम हे'' ही प्रेमकथा असून ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक अजय नाईक आहेत. ''दुनियादारी'' या चित्रपटानंतर उर्मिला कानेटकर यांचा प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. त्याचा फायदा या चित्रपटाला होऊ शकतो.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट, नंदू माधव व वीणा जामकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ''टपाल'' असून संवेदनशील दिग्दर्शक न्हणुन ओळख असलेल्या मंगेश हाडवळे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
डॉ. मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''राखणदार'' हा एक धार्मिक चित्रपट असून या चित्रपटात अजिंक्य देव व जीतेन्द्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवरात्रीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केल्यामुळे अपेक्षित प्रेक्षक वर्ग या चित्रपटाला मिळू शकतो.