Saturday, 15 August 2015

भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे हे मूळचे विदर्भातील अमरावतीचे, संघर्षाच्या काळात हिंदी व मराठी चित्रपटांतून छोट्या भूमिका करून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ''फु बाई फु'' या कार्यक्रमातून. ते सागर कारंडे यांच्यासह ''फु बाई फु''च्या सातव्या पर्वाचे ते विजेते ठरले. विदर्भीयन बोलीमुळे त्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली. सध्या सुरु ''चला हवा येऊ दया'' या कार्यक्रमातील त्यांनी केलेल्या विविध भूमिका म्हणजे भन्नाटच. त्यात त्यांनी साकारलेला त्रुटरवाडीचा सरपंच विशेष गाजतोय. येत्या २८ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या ''शेगावीचा योगी गजानन'' या चित्रपटात त्यांची भूमिका आहे. आज (१५ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!  

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
  • डॉ बाबा प्रकाश आमटे (२०१४) 
  • पोस्टर बॉयज (२०१४)  
  • भाकरवाडी ७ कि मी (२०१४) 
  • कापूस कोंड्याची गोष्ट (२०१३)  
  • गाजराची पुंगी (२०१३) 
  • मेरीडियन (२०१३) 
  • एक दार भानगडी फार (२०१३)
  • पिपानी (२०१२)
  • लंगर (२०१२) 
  • उचला रे उचला (२०१२)  
  • आम्ही सुभाष बोलची (२०११)
  • प्रतिबिम्ब (२०११) 
  • सगळ करून भागल (२०११) 
  • सद्रक्षकनाय (२०११) 
  • चल धर पकड (२०१०) 
  • डेबू (२०१०) 
  • टाटा बिरला आणि लैला (२०१०) 
  • कोण आहे रे तिकडे (२०१०) 
  • मीरा बाई नॉट आउट (२००८) 
  • ये मेरा इंडिया (२००८)
  • चेकमेट (२००८) 
  • सख्खा सावत्र (२००८)
  • एक चालीस की लास्ट लोकल (२००७) 
  • ब्लैक फ्राइडे (२००४) 
  • सातच्या आत घरात (२००४) 
  • प्राण जाये पर शान ना जाये (२००३)

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेल्या टिवी मालिका 
  • फु बाई फु 
  • चला हवा येऊ दया 

भारत गणेशपुरे यांनी अभिनय केलेले नाटक
  • जस्ट हलक फुलक



Thursday, 13 August 2015

''डबल सीट''

उद्या ''डबल सीट'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अंकुश चौधरी आणि  मुक्ता बर्वे हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ''टाईम प्लीज'' फेम समीर विध्वंस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  मायानगरी मुंबईमध्ये राहणाऱ्या नवदाम्पत्याची गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ''साढे माढे तीन'', ''दे धक्का'', ''गलगले निघाले'', ''धुडगूस'', ''एक डाव धोबीपछाड'', ''फँड्री'', ''लय भारी'', ''डॉ बाबा प्रकाश आमटे'', ''एलिजाबेथ एकादशी'', ''लोकमान्य एक युगपुरुष'', ''टाइमपास २'' आणि ''किल्ला''सारखे दर्जेदार मराठी चित्रपट देणाऱ्या एस्सेल विज़न प्रोडक्शन चा हा नवा चित्रपट आहे.  

नितीन सरांची नवीन ओळख

''सकाळ''च्या नागपूर आवृतीमधील सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकार नितीन नायगावकर म्हणजे प्रफुल्लित व्यक्तिमत्व. वाचकांसाठी स्टार रिपोर्टर अशीच त्यांची ओळख आहे. त्यापैकी मी ही एक होतो, योगायोगाने मला ''सकाळ''मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारीतेबरोबरच कवि व अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. दर रविवारी नागपूरच्या माय एफ एम स्टेशनवरून प्रसारीत होणारा त्यांचा स्वरधारा हा कार्यक्रम खुप गाजला होता. आता त्याही पलीकडे ते चित्रपट लेखक व गीतलेखक म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे. मध्यंतरी त्यांनी समीर पंडित निर्मित एका विनोदी नाटकासाठी गीतलेखन केले होते. नितिन सरांनी लिहिलेला ''शेगावीचा योगी गजानन'' हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला  प्रदर्शित आहे. त्यांनी संजीव कोलते यांच्या आगामी ''पिलन्टू'' या चित्रपटासाठी गीत लेखन ही केले आहे. नितीन सरांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!

Saturday, 8 August 2015

''ढोलकी''च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी ''ढोलकी'' या मराठी चित्रपटाचा म्यूजिक लॉन्च सोहळा हिंदी चित्रपट सुष्टिचे महानायक साक्षात अभिताभ बच्चन यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याची बरीच चर्चा झाली. त्यामुळे याचा फायदा चित्रपटाला नक्कीच होणार आहे. त्याच सोबत हिंदीतील मान्यवरांना मराठी चित्रपट सृष्टिबद्दल वाढत असलेले आकर्षण पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सध्या मराठी चित्रपटांचे फर्स्ट लुक लॉन्च, म्यूजिक लॉन्च, ट्रेलर लॉन्च असे वेगवेगळे सोहळे/ कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टितील मान्यवरांचा वाढता सहभाग नक्कीच सुखावणारा आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''जाणिवा'' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आला होता. तर त्या पूर्वीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''मनातल्या उन्हात'' या चित्रपटाचा म्यूजिक लॉन्च अनिल कपूर यांच्या हस्ते करण्यात आला होता. सध्या हिंदीतील कलवंतांना दाखवून आपल्या चित्रपटाची हवा निर्माण करण्याचा आणखी एक ट्रेंड सुरु झाला आहे. पण या सगळ्या गोष्टींचा फायदा जर चित्रपटाचा कंटेंट चांगला असेल तरच होतो हे हि महत्वाचे.

राजू देसाई व विशाल देसाई दिग्दर्शित ''ढोलकी'' मध्ये सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक, कश्मीरा कुलकर्णी, सयाजी शिंदे, ज्योती चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''

या शुक्रवारी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी बघायला मिळाली. तब्बल चार मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेत, ते आहेत ''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''.

रोमेल रॉड्रिग्स दिग्दर्शित ''गुरुकुल'' मध्ये नागेश भोसले आणि विद्याधर जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात असित रेडजी, प्रशांत मोहिते, प्रदीप कुँवर, स्वप्निल जोशी, सोनाली शेवले, नेहा खान आणि रीना लीमन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ''नीलकंठ मास्तर'' मध्ये १९४२ चा स्वत्रंतपूर्व काळ साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत आणि नेहा महाजन या युवा अभिनेत्री अतिशय वेगळया भूमिकेत दिसणार आहे. गजेन्द्र अहिरे नेहमीच कलाकारांकडून वेगळया प्रकारच्या भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करवून घेतात. या चित्रपटात विक्रम गोखले, आदिनाथ कोठारे, किशोर कदम, ओमकार गोवर्धन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

''शार्टकट'' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून बहुधा पहिल्यांदाच हैकिंग हा विषय हाताळण्यात आला आहे. हरीश राऊत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये राजेश श्रृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुड़े आणि नरेश बिडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन ''शार्टकट''ची निर्मिती करण्यात आली आहे.

जय तरी दिग्दर्शित ''सुपर्ब प्लान'' हा चित्रपट कॉर्पोरेट जगतातील स्पर्धेवर आधारीत सस्पेंस चित्रपट असून या चित्रपटात तृप्ती भोईर, सत्यानन्द गायतोंडे, गिरीश परदेशी, राजेन्द्र सिसटकर,अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दादा कोंडके

आज (८ ऑगस्ट) महाराष्ट्राचे विनोदवीर लाडके अभिनेते स्व. दादा कोंडके यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन. दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला हसविण्याचे
काम केले आणि तितकेच प्रेम रसिकांनी त्यांना दिऊन यांच्या प्रत्येक चित्रपटाला यशस्वी बनविले. सर्वात जास्त सिल्वर जुबली चित्रपट देण्याचा विक्रम ''गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'' मध्ये त्यांच्या नावावर झाला. दादा कोंडके यांच्या जीवनावर ''एकटा जीव'' हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. याच पुस्तकावर येत्या काळात संजय जाधव चित्रपट बनविणार आहे अशी बातमी मागे प्रसिद्ध झाली होती.

दादा कोंडके यांचे  चित्रपट
  • ताम्बडी माती (१९६९)
  • गनीमि कावा (१९७१)
  • सोंगाड्या (१९७१)
  • एकटा जीव सदाशिव (१९७२)
  • आंधळा मारतो डोळा (१९७३)
  • पांडू हवालदार (१९७५)
  • तुमचं आमचं जमलं (१९७६)
  • राम राम गंगाराम (१९७७)
  • नंदू जमादार (१९७७)
  • बोट लावीन तिथं गुदगुल्या (१९७८)
  • राम राम आत्माराम (१९७९)
  • ह्योच नवरा पाहिजे (१९८०)
  • आली अंगावर (१९८२)
  • तेरे मेरे बीच मे (१९८४)
  • मुका घ्या मुका (१९८६)
  • अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में (१९८६)
  • आगेकी सोच (१९८८)
  • मला घेऊन चला (१९८९)
  • खोल दे मेरी जुबान (१९८९)
  • पळवा पळवी (१९९०)
  • येऊ का घरात? (१९९२)
  • सासरचं धोतर (१९९४)
  • वाजवू का? (१९९६)

Thursday, 6 August 2015

नागेश भोसले

हिंदी व मराठी चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार भूमिकांसाठी प्रसिद्ध असेलेल व्यक्तिमत्व म्हणजे नागेश भोसले. अभिनयाबरोबरच त्यांनी ''पन्हाळा'', ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''अदगुलं मदगुलं'' या अतिशय वेगवेगळ्या विषयावरील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आज (६ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अभिनेते व दिग्दर्शक नागेश भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

नागेश भोसले यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • पन्हाळा (२०१५)
  • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९) 
  • अदगुलं मदगुलं (२०११) 


नागेश भोसले यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • प्यारवाली लव स्टोरी (२०१४)
  • धग (२०१४) 
  • दुनियादारी (२०१३)
  • चिंटू २ (२०१३)
  • शिर्डी साईं (२०१२)
  • चिंटू (२०१२)
  • स्टैण्ड बाय (२०११)
  • होस्टेल (२०११)
  • शाहरूख खुबसूरत है तू (२०१०)
  • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९) 
  • आखरी डिसिजन (२०१०)
  • धरपकड (२०११)
  • अदगुलं मदगुलं (२०११) 
  • शिवा (२००६)
  • डि (२००५)
  • क्योंकी (२००५)
  • सरकार (२००५)
  • बर्दाश्त (२००४)
  • दम (२००३)
  • थ्रिलर अॅ०ट टेन (२०००)
  • शूल (१९९९)
  • बॉम्बे बॉईज (१९९८)

किरण नाटकी