Showing posts with label aadinath kothare. Show all posts
Showing posts with label aadinath kothare. Show all posts

Saturday, 8 August 2015

''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''

या शुक्रवारी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी बघायला मिळाली. तब्बल चार मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेत, ते आहेत ''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''.

रोमेल रॉड्रिग्स दिग्दर्शित ''गुरुकुल'' मध्ये नागेश भोसले आणि विद्याधर जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात असित रेडजी, प्रशांत मोहिते, प्रदीप कुँवर, स्वप्निल जोशी, सोनाली शेवले, नेहा खान आणि रीना लीमन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ''नीलकंठ मास्तर'' मध्ये १९४२ चा स्वत्रंतपूर्व काळ साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत आणि नेहा महाजन या युवा अभिनेत्री अतिशय वेगळया भूमिकेत दिसणार आहे. गजेन्द्र अहिरे नेहमीच कलाकारांकडून वेगळया प्रकारच्या भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करवून घेतात. या चित्रपटात विक्रम गोखले, आदिनाथ कोठारे, किशोर कदम, ओमकार गोवर्धन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

''शार्टकट'' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून बहुधा पहिल्यांदाच हैकिंग हा विषय हाताळण्यात आला आहे. हरीश राऊत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये राजेश श्रृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुड़े आणि नरेश बिडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन ''शार्टकट''ची निर्मिती करण्यात आली आहे.

जय तरी दिग्दर्शित ''सुपर्ब प्लान'' हा चित्रपट कॉर्पोरेट जगतातील स्पर्धेवर आधारीत सस्पेंस चित्रपट असून या चित्रपटात तृप्ती भोईर, सत्यानन्द गायतोंडे, गिरीश परदेशी, राजेन्द्र सिसटकर,अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Wednesday, 29 April 2015

मे महिन्यातील मराठी कलाकारांचे वाढदिवस

मे महिन्यातील मराठी कलाकारांचे वाढदिवस

  • ३ मे - अजिंक्य देव (अभिनेता)
  • ३ मे - समीर सप्तिकर (संगीत दिग्दर्शक)
  • ६ मे - आसावरी जोशी (अभिनेत्री)
  • ७ मे - अनिकेत विश्वासराव (अभिनेता)    
  • ७ मे - अश्विनी भावे (अभिनेत्री)
  • ८ मे - दिपाली सैय्यद (अभिनेत्री) 
  • ८ मे - राहुल जाधव (दिग्दर्शक)
  • ९ मे - अक्षय यशवंत दत्त (डायरेक्टर)
  • ११ मे - पैडी कांबळे (अभिनेता)
  • १२ मे - अजय किशोर नाईक (दिग्दर्शक)
  • १३ मे - आदिनाथ कोठारे (अभिनेता)
  • १३ मे - अमृता सुभाष (अभिनेत्री) 
  • १३ मे - दिवाकर घोडके (दिग्दर्शक)
  • १३ मे - संदिप खरे (गीतकार) 
  • १४ मे - मानसिंग पवार (डायरेक्टर)
  • १५ मे - सर्वेश परब (दिग्दर्शक)
  • १६ मे - आस्ताद काळे (अभिनेता)
  • १६ मे - सचिन वर्तक (दिग्दर्शक)
  • १७ मे - मुक्ता बर्वे (अभिनेत्री)
  • १७ मे - तृप्ति भोईर (अभिनेत्री व दिग्दर्शिका)
  • १८ मे - सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)
  • १९ मे - गिरीश कर्नाड (अभिनेता)
  • २१ मे - जय तरी (दिग्दर्शक)
  • २१ मे - रविन्द्र मंकणी (अभिनेता)
  • २१ मे - संजय मोरे (अभिनेता)
  • २३ मे - राहुल रानडे (संगीत दिग्दर्शक)
  • २३ मे - संतोष मैनकर (दिग्दर्शक)
  • २३ मे -  तेजस्विनी पंडित (अभिनेत्री)
  • २९ मे - मृगमयी देशपांडे (अभिनेत्री)
  • २९ मे - विजय पाटकर (अभिनेता व दिग्दर्शक)
  • ३० मे - नीलम शिर्के (अभिनेत्री)
  • ३१ मे - संजय खापरे (अभिनेता)
  • ३१ मे - सुनील सुकथनकर (दिग्दर्शक)

किरण नाटकी