Saturday, 26 March 2016

अंशुमन जोशी

आज (२६ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन जोशी हा मराठी चित्रपटातील युवा अभिनेता आहे.
 अंशुमनला "शाळा" चित्रपटातील "जोश्या"च्या भूमिकेसाठी ओळखले जाते. "फोटोकॉपी" हा त्याचा आगामी चित्रपट आहे. 

Thursday, 24 March 2016

मुग्धा छापेकर

आज (२४ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मुग्धा छापेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 22 March 2016

विशाखा सुभेदार


आज (२२ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्या "फु बाई फु" या मालिकेतील त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रकाशझोतात आल्या. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.   

Monday, 21 March 2016

हेमंत ढोमे

आज (२१ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हेमंत ढोमे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "आंधळी कोथिम्बीर", "जय जय महाराष्ट्र माझा", "क्षणभर विश्रांती" "पोश्टर गर्ल" आणि "ऑनलाइन बिनलाइन" या चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनयासोबतच त्यांना लेखनाचीही आवड आहे. ते सध्या "बघतोय काय मुजरा कर" या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ते अभिनेत्री क्षिती जोग यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.

Thursday, 17 March 2016

मिलिंद शिंदे

आज (१७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी वेळात मिलिंद शिंदे एक समर्थ अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपाला आले आहेत. "नटरंग" चित्रपटातील त्यांची भूमिका खुप गाजली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांची गणना आज मराठीतील सध्याच्या घडीतील आघाडीच्या खलनायकामध्ये होते. त्यांनी "नाच तुझच लग्न हाय" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. सध्या ते "अबीर गुलाल" या नाटकात अभिनय करीत आहेत.    

Thursday, 10 March 2016

शिल्पा तुळसकर

आज (१० मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! शिल्पा तुळसकर हे गेली अनेक वर्षे रंगभूमी, टीवी आणि चित्रपटांमधुन सातत्याने चमकणार नाव आहे. निशिकांत दिग्दर्शित "डोम्बिवली फास्ट" आणि संजय सूरकर दिग्दर्शित "आनंदाच झाड" हे शिल्पा तुळसकर अभिनीत माझे आवडते चित्रपट आहेत. त्यासोबतच त्यांनी "शुगर साल्ट आणि प्रेम", "भातुकली", "क्रेजी ४" आणि "देवकी" या चित्रपटात ही भूमिका साकारल्या आहेत. 

Tuesday, 1 March 2016

चैतन्य ताम्हाणे

आज (१ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! चैतन्य ताम्हाणे यांना कोर्ट या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून दिली आहे. जगभरातील अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यावर या चित्रपटाला ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ सन्मान मिळाला. या चित्रपटाची कथा भारतीय न्याय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नारायण कांबळे या लोक शाहीराची गोष्ट सांगते.

किरण नाटकी