Thursday, 5 November 2015

वीरात वीर मराठा

आज "वीरात वीर मराठा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमोल भावे दिग्दर्शित या चित्रपटात आर्य जीत, तन्वी किशोर, रीमा लागू, हरीश सावंत आणि दया यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा एक्शन पट आहे. अमोल भावे यांनी या आधी "उचला रे उचला" आणि "पटल तर घ्या" हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे.  

पुढील आठवड्यात "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

Wednesday, 4 November 2015

सतीश पुळेकर

आज (५ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सतीश पुळेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.

विजया मेहता

आज (४ नवंबर) मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शिका विजया मेहता यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 3 November 2015

लक्ष्मीकांत बर्डे

आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतिस हार्दिक अभिवादन !!!!!

लक्ष्मीकांत बर्डे यांना सम्पूर्ण महाराष्ट्र "लक्ष्या" या टोपण नावाने ओळखायचा. आपल्या निरागस अभिनयाने लक्ष्मीकांत बर्डे यांनी सर्व महाराष्ट्राला आपलेसे केले होते. त्यांनी एका मागून एक अनेक सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपट सृष्टिला दिले. हे सर्व चित्रपट पाहतांना आजच तितकीच मजा येते. वर्षा उसगांवकर आणि प्रिया बर्डे यांच्या सोबत त्यांची जोडी अनेक चित्रपटात बघायला मिळाली. त्यांची जोडी महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन बरोबर विशेष गाजली. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ हि सर्वात जास्त गाजलेल्या जोडीपैकी एक असेल यात शंका नाही. मराठीबरोबरच हिंदित ही लक्ष्मीकांत बर्डे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या. १६ दिसंबर २००४ ला त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला. 

लक्ष्मीकांत बर्डे यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • धूमधडाका (१९८५)
  • लेक चालली सासरला (१९८५)
  • गडबड घोटाळा (१९८६)
  • चल रे लक्ष्या मुंबईला (१९८७)
  • दे दणादण (१९८७)
  • प्रेम करू या खुल्लम खुल्ल्ला (१९८७)
  • अशी ही बनवाबनवी (१९८८)
  • किस बाई किस (१९८८)
  • रंगात संगत (१९८८)
  • थरथराट (१९८९)
  • बाळाचे बाप ब्रह्मचारी (१९८९)
  • भुताचा भाऊ (१९८९)
  • मैंने प्यार किया (१९८९)
  • धडाकेबाज (१९९०)
  • धमाल बाबल्या गणप्याची (१९९०)
  • लपवा छपवी (१९९०)
  • शुभ बोल नार्‍या (१९९०)
  • अफलातून (१९९१)
  • शेम टू शेम (१९९१)
  • आयत्या घरात घरोबा (१९९१)
  • डान्सर (१९९१)
  • १०० डेज (१९९१)
  • त्रिनेत्र (१९९१)
  • प्रतिकार (१९९१)
  • मुंबई ते मॉरिशस (१९९१)
  • येडा की खुळा (१९९१)
  • साजन (१९९१)
  • अनाम (१९९२)
  • आय लव्ह यू (१९९२)
  • एक होता विदूषक (१९९२)
  • गीत (१९९२)
  • जिवलागा (१९९२)
  • दिल का क्या कसूर (१९९२)
  • दीदार (१९९२)
  • बेटा (१९९२)
  • अनाडी (१९९३)
  • आदमी खिलौना है (१९९३)
  • कृष्ण अवतार (१९९३)
  • गुमराह (१९९३)
  • झपाटलेला (१९९३)
  • तहकिकात (१९९३)
  • दिल की बाजी (१९९३)
  • संग्राम (१९९३)
  • संतान (१९९३)
  • सैनिक (१९९३)
  • हस्ती (१९९३)
  • क्रांति क्षेत्र (१९९४)
  • चिकट नवरा (१९९४)
  • द जंटलमॅन (१९९४)
  • दिलबर (१९९४)
  • बजरंगाची कमाल (१९९४)
  • ब्रह्म (१९९४)
  • हम आपके हैं कौन...! (१९९४)
  • क्रिमिनल (१९९५)
  • जमलं हो जमलं (१९९५)
  • तकदीरवाला (१९९५)
  • साजन की बाहों में (१९९५)
  • हथकडी  (१९९५)
  • अजय (१९९६)
  • चाहत (१९९६)
  • मासूम (१९९६)
  • जमीर: द अवेकनिंग ऑफ अ सोल (१९९७)
  • जोर (१९९७)
  • ढाल: द बॅटल ऑफ लॉ अगेन्स्ट लॉ (१९९७)
  • मेरे सपनो की रानी (१९९७)
  • हमेशा (१९९७)
  • दीवाना हूँ पागल नही (१९९८)
  • सर उठा के जियो (१९९८)
  • हफ्ता वसूली (१९९८)
  • आग ही आग (१९९९)
  • आरजू (१९९९)
  • जानम समझा करो (१९९९)
  • दिल क्या करे (१९९९)
  • राजाजी (१९९९)
  • लो मैं आ गया (१९९९)
  • पापा द ग्रेट (२०००)
  • बेटी नंबर १ (२०००)
  • शिकार (२०००)
  • उलझन  (२००१)
  • छुपा रुस्तम: अ म्यूझिकल थ्रिलर (२००१)
  • हॅलो गर्ल्स (२००१)
  • प्यार दीवाना होता है (२००२)
  • भारत भाग्य विधाता (२००२)
  • हम तुम्हारे हैं सनम (२००२)
  • खंजर: द नाइफ (२००३)
  • तू बाल ब्रह्मचारी मैं हूँ कन्या कुंवारी (२००३)
  • बाप का बाप (२००३)
  • खतरनाक (२००४)
  • घर गृहस्थी (२००४)
  • तौबा तौबा (२००४)
  • पतली कमर लंबे बाल (२००४)
  • मेरी बीवी का जवाब नहीं (२००४)
  • हत्या: द मर्डर (२००४)
  • इन्सान (२००५)


सोनाली कुलकर्णी

आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी" या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "अग्निवर्षा", "कितने दूर कितने पास", "कैरी", "घराबाहेर", "जहा तुम ले चलो", "जुनून", "टॅक्सी नंबर ९२११", "डरना जरूरी है", "डॉ. प्रकाश बाबा आमटे", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "दायरा", "दिल चाहता है", "दिल विल प्यार व्यार", "देवराई", "दोघी", "प्यार तूने क्या किया", "ब्राईड अँड प्रेज्युडिस", "मिशन कश्मिर", "मुक्ता", "सखी", "सिंघम" प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना "फूॅक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.sonalikulkarni.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.  

Monday, 2 November 2015

किशोर प्रधान

आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किशोर प्रधान यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरचा. नागपूरलाच त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. नंतर अभिनयाच्या ओढीमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. किशोर प्रधान यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांनी  मराठी , हिंदी आणि इंग्लिश या तीन ही भाषेत नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज वयाच्या ७९ व्या वर्षी ही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने ते कार्यरत आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये "उचला रे उचला", "कशाला उद्याची बात", "खिचडी़", "गॉड ओन्ली नोज", "छोडो कल की बातें", "जब वी मेट", "डॉक्टर डॉक्टर", "त्याचा बाप तिचा बाप", "नवरा अवली बायको लव्हली", "नवरा माझा ब्रम्हचारी", "नाना मामा", "बाप तिचा बाप", "भिंगरी", "मस्ती एक्सप्रेस", "मास्तर एके मास्तर", "मीराबाई नॉट आउट", "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय", "रफ़्तार", "रानपाखरा", "रूल्स प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला", "लगे रहो मुन्नाभाई", "लाडीगोडी", "लालबाग परळ", "वन रूम किचन", "वरचा मजला रिकामा त्याचा", "शहाणपण देगा देवा", "शिक्षणाच्या आईचा घो", "शेजारी शेजारी" आणि "सिटी ऑफ गोल्ड" हे चित्रपट प्रमुख आहेत.

अरुण कदम

आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अरुण कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

अरुण कदम मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपट, टिवी मालिका आणि नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांना "ETV मराठी" वरील "कॉमेडी एक्सप्रेस" या मालिकेने नविन ओळख मिळवून दिली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या www.arunkadam.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

किरण नाटकी