Showing posts with label jitendra joshi. Show all posts
Showing posts with label jitendra joshi. Show all posts

Thursday, 2 July 2015

''ढोल ताशे '', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''

मागील दोन आठवड्याप्रमाणेच ह्या आठवड्यातही तीन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''.

अंकुर काकटकर दिग्दर्शित ''ढोल ताशे'' मध्ये जितेन्द्र जोशी, अभिजीत खांडकेकर, हृषिता भट्ट, प्रदिप वेलणकर, इला भाटे, विद्याधर जोशी, विजय अढाळकर, शेखर फडके, राजकुमार अंजूटे आणि स्व. विनय आपटे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून ढोल ताशाच्या माध्यमातून युवकांची व राजकारणाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृषिता भट्ट मराठी चित्रपट सृष्टित पुनरागनम करत आहे.  

केदार गायकवाड दिग्दर्शित नवीन पिढीमध्ये असणाऱ्या सोशल मीडीयाच्या क्रेजची गोष्ट सांगणारा ''ऑनलाईन बिनलाईन'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमने, ऋतुजा शिंदे, प्रशांत कामत आणि पौर्णिमा मनोहर अशा यंग चार्म्सच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार गायकवाड हा युवा छायाचित्रकार दिग्दर्शन न्हणुन पदार्पण करीत आहे.

या शुक्रवारी ''शटर'' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित होतोय. वि के प्रकाश दिग्दर्शित ''शटर'' मध्ये सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, राधिका हर्षे, कमलेश सावंत आणि अनिरुद्ध हरीप यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''नागरीक'' नंतर पुन्हा एकदा सचिन खेडेकर ''शटर''च्या निमित्ताने एका आगळ्या वेगळया भूमिकेत दिसणार आहेत. 

उद्या प्रदर्शित होणाऱ्या सर्वच चित्रपटात आघाडीचे कलावंत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' या चित्रपटाचे प्रोमोशनही अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे त्यामुळे मागील दोन आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यात टिकिट खिडकीवर चुरशीची स्पर्धा बघायला मिळणार आहे.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम ज़िन्दगी'' या चित्रपटांमध्ये ''किल्ला''ने कमाईच्या बाबतीत बाजी मारली असून या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींचा गल्ला जमविला आहे. स्वप्निल जोशी यांच्या ''वेलकम ज़िन्दगी''ला पण प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

पुढच्या आठवड्यात ''मर्डर मेस्ट्री'' हा बहु-प्रतिक्षित हे चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

Saturday, 25 April 2015

''म्हैस'' आणि ''आटली बाटली फुटली''

ह्या शुक्रवारी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''म्हैस'' आणि ''आटली बाटली फुटली''. 

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट न्हणजे ''म्हैस'', पु ल देशपांडे याच्या ''न्हैस'' या कथेवर आधारीत या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर नाईक यांनी केले आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी, यतीन कार्येकर यांच्या भूमिका आहेत.  

सध्या लहान मुलांवर आधारीत चित्रपटांचा ट्रेन्ड मराठीत आलाय. त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडलीय तो न्हणजे आज प्रदर्शित झालेला ''आटली बाटली फुटली''. अमोल पाडवे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्मिता तळवलकर, सम्पदा जोगळीकर कुलकर्णी यांच्यासोबतच बच्चे कंपनीच्या महत्वाच्या भूमिका आहे.

Thursday, 9 April 2015

काकण

उद्या ''काकण'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटांमधील सध्याच्या प्रमुख अभिनेत्रीपैकी एक असलेल्या क्रांति रेडकर दिग्दर्शका न्हणुन पदार्पण करीत आहेत. सध्या मराठी चित्रपट सृष्टीत महिला दिग्दर्शकांचे नविन पर्व सुरु झाले आहे, त्यात आता क्रांति रेडकर यांच्या ''काकण''ची भर पडली आहे. अभिनेत्रींनी चित्रपट दिग्दर्शित करणे, आता मराठी चित्रपट सृष्टिला नवे राहिलेले नाही. अलीकडे मृणाल कुलकर्णी, मनवा नाईक या अभिनेत्रींनी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिले आहे. 

''काकण'' हि प्रेमकथा असून या चित्रपटात जीतेन्द्र जोशी व उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी किशु आणि सुधामतीची प्रेमकहानी रंगवली आहे. ''काकण'' या चित्रपटाची मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे झाली असून आधीच या चित्रपटाचा ट्रेलर गाजत आहे. या चित्रपटातील जीतेन्द्र जोशीच्या लुक बद्दल ही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. 

यावर्षी ५२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रथम पदार्पण निर्मिति या श्रेणीत ''काकण''ला नामांकन प्राप्त झाले आहे   . 

Friday, 27 March 2015

जस्ट गम्मत

आज मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित ''जस्ट गम्मत'' हा मल्टीस्टारर मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या अाधी मिलिंद अरुण कवडे यांनी ''४ इडियट्स'' व ''येड्याची जत्रा'' हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे. ''जस्ट गम्मत'' हा सुद्धा विनोदी चित्रपट आहे. या सोबतच त्यांचा आगामी ''१२३४ '' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.  

''जस्ट गम्मत''मध्ये जितेंद्र  जोशी, संजय नार्वेकर, अदिती सारंगधर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, अतुल तोडनकर, दिपक शिर्के अशी तगड़ी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा करुया.

Friday, 6 February 2015

बाजी

आज ''बाजी'' हा बहु-प्रतीक्षित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ''बाजी''चे दिग्दर्शन ''पुणे ५२'' फेम निखिल महाजन यांनी केले आहे. ''बाजी''मध्ये श्रेयस तलपडे आणि अमृता खानविलकर यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''बाजी''च्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर श्रेयस तलपडे मराठी चित्रपटांमध्ये नायकाच्या रुपात पुनरागमन करत आहेत. दुनियादारी नंतर पुन्हा एकदा या चित्रपटात जितेन्द्र जोशी खलनायकाच्या रुपात बघायला मिळणार आहे. ''बाजी''मध्ये रवी जाधव, नागराज मंजुळे आणि गिरिजा ओक पाहुण्या भूमिकेत आहेत. पहिला मराठी सुपरहीरो चित्रपट न्हणुन ''बाजी''चे प्रमोशन केले जात आहे.

किरण नाटकी