Showing posts with label Makarand Anaspure. Show all posts
Showing posts with label Makarand Anaspure. Show all posts

Wednesday, 22 July 2015

मकरंद अनासपुरे

आज मराठीतील सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !! मकरंद अनासपुरे यांनी ''सरकारनामा'' या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''कायद्याच बोला'' या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. पण विनोदी अभिनेता असा ठसा पुसण्यासाठी त्यांनी ''सुम्भराण'', ''पारध'', ''अनवट'' अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे. सोबतच त्यांनी ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ'' दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.      

मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट
  • साठ लोट पण सगळ खोट (२०१४)
  • कापूस कोंड्याची गोष्ट (२०१३) 
  • दणक्यावर दणका (२०१३) 
  • वी आर ऑन - होऊन जाऊ दया (२०१३) 
  • गड्या आपल गाँव बर (२०१३) 
  • बीडचा राजा (२०१३)
  • मला एक चांस हवा (२०१२)  
  • तीन बायका फजीती ऐका (२०१२) 
  • तिचा बाप त्याचा बाप (२०११)
  • डँबीस (२०११)
  • दोन घडीचा डाव (२०११)
  • गुलदस्ता (२०११)
  • डावपेच (२०११)
  • पारध (२०१०)
  • हापुस (२०१०)
  • तुक्या तुकविला नाग्या नाचविला (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • खुर्ची सम्राट (२०१०)
  • बत्ती गुल पावरफुल (२०१०)
  • मन्या सज्जना (२०१०)
  • माय फ्रेंड गणेशा ३ (२०१०) 
  • निशानी डावा अंगठा (२००९)
  • सगळ करून भागल (२००९)
  • नऊ महिने नऊ दिवस (२००९)
  • बाप रे बाप डोक्याला ताप (२००९)
  • नो प्रॉब्लम (२००९)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
  • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९)
  • सासु नंबरी जवाई दस नंबरी (२००८)
  • दे धक्का (२००८)
  • डम डम डिगा डिगा (२००८)
  • उलाढाल (२००८)
  • फुल ३ धमाल (२००८)
  • ऑक्सीजन (२००८)
  • दोघात तिसरा आता सगळ विसरा (२००८)
  • साढ़े माढ़े तीन (२००७)
  • ज़बरदस्त (२००७)       
  • अरे देवा (२००७) 
  • तुला शिकविण चांगलाच धडा (२००७)   
  • जाऊ तिथे खाऊ (२००७) 
  • गाढवाचे लग्न (२००७) 
  • नाना मामा (२००६)
  • शुभमंगल सावधान (२००६)
  • खबरदार (२००६)  
  • कायद्याचे बोला (२००५) 
  • सावरखेड एक गाँव (२००४)
  • सातच्या आत घरात (२००४)
  • प्राण जाए पर शान ना जाए (२००३)
  • जिस देश में गंगा रहता है (२०००)
  • वास्तव (१९९९) 
  • यशवंत (१९९७) 
  • सरकरनामा (१९९७)  

Monday, 22 June 2015

''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'' आणि ''वांटेड बायको नंबर १''

आज ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'' आणि ''वांटेड बायको नंबर १'' असे तब्बल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहे.

कमल ठाकुर दिग्दर्शित ''२ प्रेमी प्रेमाचे'' या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि गिरीजा ओक यांची जोडी बघायला मिळणार  आहे. हा चित्रपट मर्मस्पर्शी प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर वरुन लक्षात येते की या चित्रपटाचे चित्रीकरण बहुधा खुप पूर्वी झाले असावे. स्वप्निल जोशी यांचा चित्रपट असून सुद्धा या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाहीये.

या प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट न्हणजे ''ब्लैकबोर्ड''. दिनेश देवलेकर दिग्दर्शित हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आधारीत आहे. ''ब्लैकबोर्ड'' मध्ये अरुण नलावडे, माधवी जुवेकर, सायली देवधर आणि मृगमयी सुपाळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

राहुल वाकणकर दिग्दर्शित ''टाइम बरा वाईट''ची प्रसिद्धी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ''टाइम बरा वाईट'' बद्दल उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलर एकदम झक्कास असून तो तुम्ही यूटुबवर बघु शकता. आता प्रत्यक्ष चित्रपट कसा आहे? हे बघणे महत्वाचे ठरेल. ''टाइम बरा वाईट'' मध्ये भूषण प्रधान, महेश मांजरेकर, सतीश राजवाड़े, निधि ओझा, ऋषिकेश जोशी, विश्वजीत प्रधान, भाऊ कदम, संजय मोने, आनंद इंगले अशी दिग्गज अभिनेत्यांची फ़ौज आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये न्हणजे यात प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे ''भाई राजा'' नावाच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला आणखी एक न्हणजे ''वांटेड बायको नंबर १'', हा विनोदी चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे. ''वांटेड बायको नंबर १'' मध्ये मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, तेजस्विनी लोणारी, स्मिता गोंदकर, संजय खापरे, मनोज टकने, मिथाली वारंग, विजय गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Sunday, 31 May 2015

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • १ जून - लक्ष्मण उतेकर (दिग्दर्शक)
  • २ जून - महेंद्र कदम (दिग्दर्शक) 
  • २ जून - सतीश सालग्रे (दिग्दर्शक)
  • २ जून - तेजश्री प्रधान (अभिनेत्री)
  • ४ जून - अशोक सराफ (अभिनेता)
  • ४ जून - हेमलता बाने (अभिनेत्री) 
  • ५ जून - महेश टिळेकर (दिग्दर्शक) 
  • ६ जून - अक्षय भिंगार्डे (अभिनेता) 
  • ६ जून -आनंद शिशुपाल (दिग्दर्शक) 
  • ९ जून - पल्लवी सुभाष (अभिनेत्री) 
  • ९ जून - समीर पाटिल (दिग्दर्शक)
  • १० जून - पुण्डलिक धुमाळ (दिग्दर्शक)  
  • ११ जून - त्यागराज खाडिलकर (संगीत दिग्दर्शक)  
  • १२ जून - युग (अभिनेता)  
  • १४ जून - मिलिंद पेडणेकर (दिग्दर्शक) 
  • १४ जून - सुनील तावडे (अभिनेता)  
  • १५ जून - राज पैठणकर (दिग्दर्शक)  
  • १५ जून - सुभाष काळे (दिग्दर्शक) 
  • १६ जून - श्रीरंग गोडबोले (दिग्दर्शक) 
  • १७ जून - सिद्धार्थ चांदेकर (अभिनेता) 
  • १७ जून - सुनील अभ्यंकर (अभिनेता) 
  • २१ जून - अशोक कार्लेकर (दिग्दर्शक)  
  • २१ जून - मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री)    
  • २१ जून - रीमा लागू (अभिनेत्री) 
  • २३ जून - डॉ नेहा राजपाल (गायिका)  
  • २३ जून - जब्बार पटेल (दिग्दर्शक)  
  • २३ जून - स्वप्निल जाधव (अभिनेता) 
  • २५ जून - सई ताम्हणकर (अभिनेत्री) 
  • २८ जून - मंगेश देसाई (अभिनेता)  
  • ३० जून - निलेश साबळे (अभिनेता)
  • ३० जून - सुप्रिया मतकरी (अभिनेत्री) 
  • ३० जून - विकास समुद्रे (अभिनेता)

किरण नाटकी