Showing posts with label atul kale. Show all posts
Showing posts with label atul kale. Show all posts

Friday, 25 December 2015

अतुल काळे

आज (२५ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतुल काळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरील मराठी चित्रपट दिग्दर्शित करुन मराठी चित्रपट सुष्टित आपली दिग्दर्शक म्हणून वेगळी छाप सोडली आहे. मागच्या वर्षी अतुल काळे दिग्दर्शित ''बाळकडू" आणि "सन्दूक" हे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही वेगवेगळया प्रकारचे चित्रपट होते. 

अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • मातीच्या चुली (२००६)
  • दे धक्का (२००८)
  • तीचा बाप त्याचा बाप (२०११) 
  • बाळकडू (२०१५)
  • सन्दूक (२०१५)

Thursday, 4 June 2015

''अतिथि'', ''संदूक'' आणि ''साठ लोट पण सगळ खोट''

उद्या ३ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''अतिथि'', ''संदूक'' आणि ''साठ लोट पण सगळ खोट''.

आशिष पुजारी दिग्दर्शित ''अतिथि'' हि मल्टीस्टारर ब्लैक कॉमेडी आहे. या चित्रपटात विजय चव्हाण, मिलिंद शिंदे, संजय खापरे, संजय मोहिते, किशोर चौगुले, किशोर नंदलस्कर, नयन जाधव, संजीवनी जााधव, प्रशांत तपस्वी, अनंत जोग, तेजपाल वाघ, रोहित चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात होटल अतिथि देवो भव मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या पाहुण्यांची व मालकाची गोष्ट आहे.

सध्या हिंदी कलाकारांना घेऊन मराठीत चित्रपट करण्याचा ट्रेन्ड सुरु आहे, या मध्ये  आता ''संदूक'' या चित्रपटाची भर पडली आहे. अतुल काळे दिग्दर्शित या चित्रपटात सुमित राघवन व भार्गवी चिरमूले यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे, रमेश वाणी, राहुल गोरे, शांतनु घंघाने, मंगेश सातपुते, सिद्धेश प्रभाकर, दिवेश मेंडगे, नंदकुमार पाटिल, अजित परब, फ़िरदौस मेवावाला यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. अतुल काळे यांनी या आधी बाळकडू, तिचा बाप त्याचा बाप, दे धक्का, मातीच्या चूली या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ''संदूक'' हा ऐतिहासिक विनोदी चित्रपट आहे. 

''सरकारनामा'' सारख्या मराठी क्लासिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रभणी देवधर प्रदीर्घ कालवधीनंतर त्यांचा नवीन चित्रपट ''साठ लोट पण सगळ खोट'' घेऊन मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. चित्रपटाच्या नावातच स्पष्ट होते की हा विनोदी चित्रपट आहे. मकरंद अनासपुरे, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर शोत्री अशी तगड़ी स्टार कास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका व स्टार कास्ट यामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटापासून अपेक्षा वाढल्या आहेत.

किरण नाटकी