Showing posts with label amol shetge. Show all posts
Showing posts with label amol shetge. Show all posts

Friday, 1 July 2016

अमोल शेटगे

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमोल शेटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "गुनाह", "नाम गुम जायेगा", "रेन", "रवी किशन", "कभी कहीं", "लव रेसेपी" या हिंदी चित्रपटांचे व "सौ शशी देवधर", "वन वे टिकिट" आणि "सिटीजन" या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला "वन वे टिकिट" हा मराठीतील क्रूज़ वर चित्रित केलेला पहिला चित्रपट होता. 

Friday, 16 October 2015

''सिटीजन" आणि "राजवाडे एण्ड सन्स"

आज ''सिटीजन" आणि "राजवाडे एण्ड सन्स" हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि हे दोन्ही चित्रपट युवकांवर आधारित आहेत, हे विशेष.

अमोल शेटगे दिग्दर्शित ''सिटीजन" हा युवकांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतिन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टिकेकर, नंदिता जोग, श्रीरंग देशमुख आणि माधव देवचके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

सचिन कुंडलकर दिग्दर्शित "राजवाडे आणि सन्स" या चित्रपटात दोन पिढ्यांचा संघर्ष रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सचिन खेडीकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योति सुभाष, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृगमयी गोडबोले, कृतिका देव, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे अशी दिग्गज आणि युवा कलाकारांची टिम आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अतुल कुलकर्णी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आहे.   

किरण नाटकी