Showing posts with label amol palekar. Show all posts
Showing posts with label amol palekar. Show all posts

Tuesday, 24 November 2015

अमोल पालेकर

आज (२४ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अमोल पालेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमोल पालेकर यांना अभिनेता आणि दिग्दर्शन दोन्ही क्षेत्रात समान यश मिळाल आहे. १९७१ साली प्रदर्शित "शांतताकोर्ट चालू आहे" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. हा चित्रपट त्या काळी खुप चर्चेत होता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात मध्यमवर्गीय नायक म्हणून आपली एक वेगळी ओळख स्थापित केली. १९८१ साली प्रदर्शित झालेला "आक्रीत" हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट, त्यानंतर त्यांनी "अनकही", "थोड़ा सा रूमानी हो जायें", "बनगरवाडी", "दरिया", "कैरी", "ध्यासपर्व", "अनाहत", "पहेली", "क्वेस्ट", "दूमकटा", "समांतर" आणि "धूसर" हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.amolpalekar.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.  

अमोल पालेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१)
  • रजनीगंधा (१९७४)
  • छोटी सी बात (१९७५)
  • जीवन ज्योति (१९७५)
  • चितचोर (१९७६)
  • भूमिका  (१९७७)
  • कन्नेशवरा रामा (१९७७)
  • सफेद झूठ (१९७७)
  • अगर (१९७७)
  • घरौंदा (१९७७)
  • टैक्सी टैक्सी (१९७७)
  • दामाद (१९७८)
  • गोल माल (१९७९)
  • मेरी बीवी की शादी (१९७९)
  • दो लड़्के दोनो कड़्के (१९७९)
  • बातों बातों में (१९७९)
  • जीना यहाँ (१९७९)
  • आँचल (१९८०)
  • अपने पराये (१९८०)
  • नरम गरम (१९८१)
  • समीरा (१९८१)
  • अग्नि परीक्षा (१९८१)
  • आक्रित (१९८१)
  • चेहरे पे चेहरा (१९८१)
  • जीवन धारा (१९८२)
  • ओलंगल (१९८२)
  • रामनगरी (१९८२)
  • श्रीमान श्रीमती (१९८२)
  • रंग बिरंगी (१९८३)
  • प्यासी आँखें (१९८३)
  • आदमी और औरत (१९८४)
  • तरंग (१९८४)
  • खामोश (१९८५)
  • झूठी (१९८५)
  • अनकही (१९८५)
  • बात बन जाये (१९८६)
  • तीसरा कौन (१९९४)
  • अक्स (२००१)

Sunday, 12 April 2015

मराठी कलाकारांच्या वेबसाईट्स

कलाकार व त्यांचे चाहते यांच्यामध्ये एक आगळे वेगळे नाते असते. विविध माध्यमातून फैंस त्यांच्या आवडत्या कलाकारांना फॉलो करीत असतात. सध्या बहुतेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक व संगीतकार फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्या फैंसच्या संपर्कात असतात. मराठी चित्रपट सृष्टितील काही कलाकार त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटच्या माध्यमातून ही त्यांच्या फैंसच्या संपर्कात असतात. या वेबसाइट्समध्ये कलाकारांची ओळख, त्यांच्या चित्रपटांची माहिती, त्यांना मिळालेले पुरस्कार अशा प्रकारची माहिती असते. या वेबसाईट्सच्या  माध्यमातून फँस त्यांच्या आवडत्या कलाकारांशी संपर्क साधू शकतात, त्यांना प्रश्न विचारु शकतात. या वेबसाइट्स कलाकरांसारख्याच क्रिएटिव आहेत. काही मराठी कलाकारांच्या वेबसाईट्स खाली दिलेल्या आहेत. नक्की बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.

लेखक, अभिनेते व दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची वेबसाइट - www.abhirambhadkamkar.com
संगीतकार अजय अतुल यांची वेबसाइट - www.ajayatul.com                         
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांची वेबसाइट - www.amolpalekar.com
अभिनेत्री अमृता खानविलकर यांची वेबसाइट - www.amrutakhanvilkar.in
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची वेबसाइट - www.ashutoshgowariker.com
अभिनेते अतुल कुलकर्णी यांची वेबसाइट - www.atulkulkarni.com 
अभिनेते अतुल परचुरे यांची वेबसाइट - www.atulparchure.com
गायक, संगीतकार व दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची वेबसाइट - www.avadhootgupte.com
गायिका बेला शेंडे यांची वेबसाइट - www.belashende.com
दिग्दर्शक चन्द्रकान्त कुलकर्णी यांची वेबसाइट - www.chandrakantkulkarni.com
जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर यांची वेबसाइट - www.dilipprabhavalkar.com
कवी व गीतकार गुरु ठाकुर यांचा ब्लॉग - www.guruthakur.blogspot.in
संगीतकार हर्षित अभिराज यांची वेबसाईट - www.harsshitabhiraj.com
दिग्दर्शक हेमंत देवधर यांची वेबसाईट - www.hemantdeodhar.com
जेष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांची वेबसाईट - www.ilabhate.com
अष्टपैलू अभिनेत्री स्पृहा जोशी यांचे ब्लॉग्स - www.kangoshti.blogspot.in, www.itihasatyadivshi.blogspot.comwww.vachuanande.blogspot.com
संगीतकार कौशल ईनामदार यांची वेबसाईट - www.kaushalsinamdar.com
संगीतकार केदार भागवत यांची वेबसाईट - www.kedarbhagwat.com
जेष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांची वेबसाईट - www.kishorepradhan.org
अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांची वेबसाईट - www.maheshmanjrekar.com
अभिनेता मिलिंद गवळी यांची वेबसाईट - www.milindgawali.com
लेखक व अभिनेते मिलिंद गुणाजी यांची वेबसाईट - www.milindgunaji.in
गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांची वेबसाईट - www.milindingle.com
अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची वेबसाईट - www.muktabarve.com
संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांची वेबसाईट - www.narendrabhide.com
विनोदी अभिनेते नवीन प्रभाकर यांची वेबसाईट - www.navinprabhakar.com
कला दिग्दर्शक नितिन देसाई यांची वेबसाईट - www.nitindesaionline.com
छायाचित्रकार नितिन घग यांची वेबसाईट - www.nitinghag.com
अभिनेते प्रथमेश परब यांची वेबसाईट - www.pprathameshparab.com
अभिनेते प्रशांत दामले यांची वेबसाईट - www.prashantdamle.com
संगीतकार राहुल रानडे यांची वेबसाईट - www.rahulranade.com
अभिनेते राजेश श्रृंगारपूरे यांची वेबसाईट - www.rajeshshringarpore.com
जेष्ठ लेखक व दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांची वेबसाईट - www.ratnakarmatkari.com
दिग्दर्शिका समृद्धि पोरे यांची वेबसाईट - www.samruddhiporey.com
गायक संजीव अभ्यंकर यांची वेबसाईट - www.sanjeevabhyankar.com
अभिनेते सयाजी शिंदे यांची वेबसाईट - www.sayajishinde.com
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची वेबसाईट - www.sonaleekulkarni.com
लेखक व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची वेबसाईट - www.sonalikulkarni.org
अभिनेते सुनील बर्वे यांची वेबसाईट - www.sunilbarve.com
अभिनेते उपेन्द्र लिमये यांची वेबसाईट - www.upendralimaye.com

Thursday, 9 April 2015

''काकण''च्या निमित्ताने

उद्या ''काकण'' ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री क्रांति रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे, त्यानिमित्त अलीकडे अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या कलाकारांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.  

मराठीमध्ये मास्टर विनायक यांच्यापासून चालत आलेली मराठी अभिनेता ते दिग्दर्शकाची परंपरा दादा कोंडके, अमोल पालेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर ते अंकुश चौधरी यांच्या पर्यन्त पोहचली आहे. आता या परंपरेत मराठी अभिनेत्री मोलाचा वाटा उचलत आहे. दिग्दर्शक हा चित्रपट यूनिटचा कप्तान असतो असे न्हणतात, चित्रपटातील निर्माता, अभिनेता, छायाचित्रकार, लेखक, संकलक, चित्रपट समीक्षक असा प्रत्येक घटक कधी ना कधी दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न बघत असतो, न्हणुनच या सर्व घटकांचे प्रतिनिधि दिग्दर्शक न्हणुन आपल्या समोर येतात.       

अलीकडे मराठीत सातत्याने सक्रिय असलेल्या अभिनेत्री ते दिग्दर्शिका असा प्रवास केलेल्यामध्ये मृणाल कुलकर्णी यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी अलीकडे ''प्रेम न्हणजे प्रेम न्हणजे प्रेम असते'' व ''रमा माधव'' या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी हे दोन्ही विषय अतिशय वेगवेगळ्या विषयांना घेऊन बनवले आहे. किशोरी शहाणे यांनी पण ''रीटा''च्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले आहे. मागील वर्षी मनवा नाईक यांचा ''पोरबाजार'' हा चित्रपट प्रदर्शित झाला.     

अलीकडे सातत्याने मराठी मध्ये दिग्दर्शन करीत असलेल्या अभिनेत्यांमध्ये अंकुश चौधरी यांचे नाव प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल. सतत वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अंकुश चौधरी यांनी ''साडे माडे तीन'', ''झक्कास'', ''नो एंट्री - पुढे धोका आहे'' या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांपैकी ''झक्कास'' व ''नो एंट्री - पुढे धोका आहे'', या चित्रपटात त्यांची भूमिकाही होती हे विशेष.  

अमोल पालेकर यांनी ''आक्रीत'', ''बनगरवाडी'', ''कैरी'', ''ध्यासपर्व'', ''धूसर'', ''समान्तर'' व ''अनाहत'' या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणले आहे. महेश मांजरेकर यांनी ''अस्तित्व'', ''शिक्षणाच्या आईचा घो'', ''लालबाग परळ'', ''फक्त लढ न्हणा'', ''काकस्पर्श'' व ''कोकणस्थ''च्या माध्यमातून मराठी रसिकांना पुन्हा चित्रपट गृहाकडे आणण्याची महत्त्वाची कामगीरी बजावली आहे. सचिन पिळगावकर यांनी मागील ३३  वर्षापासून अनेक दर्जेदार मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत, अभिनय व दिग्दर्शन एकाच वेळेस करणे खुप कठीण जाऊ शकते पण सचिन पिळगावकर यांनी. हे व्यवस्थितपणे सांभाळले. हिच गोष्ट आपण महेश कोठारे यांच्या बद्दलही न्हणु शकतो. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेरडे व अशोक सराफ यांना घेऊन अनेक दर्जेदार विनोदी चित्रपट बनवले. एके काळी महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेरडे व अशोक सराफ यांची तिकडी न्हणजे यशस्वी मराठी चित्रपटाचा हमखास फार्मूला होता. आज ही ते सर्व चित्रपट टीवीवर बघतांना याचा प्रत्यय येतो. विजय पाटकर सुद्धा अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रावर सारखीच पकड ठेवतात.

२०१० साली सचित पाटिल यांनी ''क्षणभर विश्रांती'' हा अतिशय यूथफुल चित्रपट दिग्दर्शित केला होता. याच वर्षी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ''अाघात'' हा वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला होता. अजिंक्य देव यांनी पण २०१० साली ''जेता'' हा चित्रपट दिग्दर्शित केला. मकरंद अनासपुरे यांनी २०११ साली ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मकरंद देशपांडे यांनी मागच्या वर्षी ''सैटरडे सन्डे'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नागेश भोसले यांनी मागील काही वर्षात ''अडगुल मडगुल'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' व ''गल्लीत गोंडळ दिल्लीत मुजरा''चे दिग्दर्शन केले असून त्यांचा ''पन्हाळा'' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.        

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ''पोस्टर बॉयज़''च्या सीक्वेलच्या निमित्ताने श्रेयस तलपदे दिग्दर्शक बनणार असल्याची सध्या बातमी आहे. गिरीश कुलकर्णी ''जाऊ दया ना बाळासाहेब'' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. प्रख्यात अभिनेते सुबोध भावे ''कट्यार काळजात घुसली'' च्या निमित्ताने दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्यांचा हा चित्रपट याच वर्षी नवंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

किरण नाटकी